◆ बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटीची स्थापना कधी करण्यात आली?
1857
1873
1855
1843√
स्पष्टीकरण
जॉर्ज थॉम्पसन, द्वारकानाथ टागोर, चंद्र मोहन चॅटर्जी आणि परमानंद मैत्र यांनी 1843 मध्ये बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटीची स्थापना केली.
◆ माणिकतोळा कटात खालीलपैकी कोणाचा सहभाग होता?
अ】 भूपेंद्रनाथ दत्त ब】 भगतसिंग क】 अरविंद घोष ड】 खुदिराम बोस
अ , ब , क
अ, क , ड √
अ , ब , ड
ब , क , ड
वरील सर्व
स्पष्टीकरण
माणिकतोळा कट खटला / अलीपूर कट:- 1908
बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष. यांचा या कटात सहभाग होता
◆ सत्य विधान /ने ओळखा :
अ】 सार्वजनिक सभा 1877 साली स्थापन करण्यात आली.
ब】 गणेश वासुदेव जोशी आणि न्या रानडे यांचा सार्वजनिक सभा स्थापन करण्यात सहभाग होता.
अ , ब
फक्त अ
फक्त ब √
कोणतेही नाही
स्पष्टीकरण
सार्वजनिक सभा 1870 साली स्थापन करण्यात आली.
◆ पब्लिक सेफ्टी बिल ब्रिटिश सरकारने कधी संमत केले.
10 मार्च 1928
08 एप्रिल 1928
08 एप्रिल 1929 √
27 जून 1929
स्पष्टीकरण
भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी'पब्लिक सेफ्टी बिल' आणि 'ट्रेड डिस्प्यूट बिल' याला विरोध म्हणून दोघांनी 8 एप्रिल 1929 मध्ये सेंट्रल असेंबली मध्ये बॉम्बस्फोट घडवला
◆ मुखपत्र व संपादक याबाबत चुकीची जोडी ओळखा:
अ】 न्यू इंडिया : अरविंद घोष
ब】 हितवाद : गोपाळ हरी देशमुख
क】 इंदूप्रकाश : डॉ भाऊ दाजी लाड
फक्त क
फक्त अ ब
फक्त अ
अ ब क √
स्पष्टीकरण
» न्यू इंडिया इंग्लिश भाषेमधील दैनिक वृत्तपत्र
1 जून 1994 मध्ये एनी बेझंट यांनी सुरू केले
» हितवाद इंग्लिश भाषेमधील दैनिक वृत्तपत्र
1911 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी सुरू केले
» इंदूप्रकाश मराठी भाषेमधील दैनिक वृत्तपत्र
2 जानेवारी 1862 मध्ये विष्णुशास्त्री पंडित यांनी सुरू केले
◆ खालीलपैकी कोणते मुस्लीम नेते राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात सहभागी झाले होते ?
अ】 आर एम सयानी
ब】 बॅरिस्टर जीना
क】 ए एम धरमसी
ड】 सर सय्यद अहमद खान
अ , क √
अ , क , ड
फक्त क , ड
वरील सर्व
◆ खालीलपैकी कोणती विधान/ने सत्य आहेत ओळखा
अ】 डेक्कन असोसिएशन' ची स्थापना मुंबई येथे झाली.
ब】 मद्रास महाजन सभा इ.स 1888 मध्ये स्थापन करण्यात आली.
फक्त ब
फक्त अ
वरील दोन्ही√
यापैकी नाही
स्पष्टीकरण
» डेक्कन असोसिएशनची स्थापना पुणे येथे झाली.
» रामास्वामी मुदलियार आणि पी. आनंदचारलू यांनी 1884 मध्ये मद्रास महाजन सभेची स्थापना केली
◆ बंग भाषा प्रकाशिका सभा कोणत्या वर्षी स्थापना करण्यात आली.
1836 √
1840
1834
1838
स्पष्टीकरण
भारतातील पहिली संघटित राजकीय संघटना होती असून राजा राम मोहन रॉय यांच्या सहकाऱ्यांनी 1936 मध्ये गौरीशंकर तारकाबागीश यांच्या नेतृत्वाखाली कलकत्ता येथे बंगभाषा प्रकाशिका सभा सुरू केली.
◆ पंडिता रमाबाई यांच्याबाबत सत्य विधान/ने ओळखा
अ】 24 सप्टेंबर 1888 आर्य महिला समाजाची स्थापना केली
ब】 24 सप्टेंबर 1898 रोजी केडगावला 'मुक्तिसदना'चे उद्घाटन करण्यात आले.
अ व ब
फक्त ब √
फक्त अ
यापैकी नाही
स्पष्टीकरण
प्रत्येक स्त्रीला सन्माननीय जीवन जगण्यासाठी सक्षम आणि शिक्षित करणे ' या उद्देशाने पंडिता रमाबाई यांनी 30 नोव्हेंबर 1882 रोजी आर्य महिला समाजाची स्थापना केली
24 सप्टेंबर 1898 रोजी केडगाव येथे 'मुक्तिसदना'ची पंडिता रमाबाई यांनी स्थापना केली.
◆ बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना करण्यात कोणाचा सहभाग होता ?
अ】 के टी तेलंग
ब】 लोकमान्य टिळक
क】 फिरोजशहा मेहता
ड】 बुद्रुद्दीन तय्यबजी
इ】 जगन्नाथ शंकरशेठ
अ , ब , क
अ , ब , ड
अ, क , ड √
वरील सर्व
स्पष्टीकरण
बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना फेरोजशाह मेहता, केटी तेलंग आणि बद्रुद्दीन तयबजी यांनी 1885 मध्ये केली होती.
◆ खालीलपैकी कोण कुलकर्णी लोकांना ग्रामराक्षस असे म्हणत होते.
भास्करराव जाधव
छत्रपती शाहू महाराज
दिनकरराव जवळकर
यापैकी नाही√
स्पष्टीकरण
महात्मा फुले हे कुलकर्णी लोकांना ग्रामराक्षस म्हणत.
◆ इ.स. 1902 साली कोल्हापूर येथे सरकारी नोकऱ्यात ............... राखीव ठेवण्याचा निर्णय छत्रपती महाराजांनी घेतला. .. टक्के जागा शाहू
18
37
33
50 √
स्पष्टीकरण
06 जुलै 1902 रोजी कोल्हापूर या संस्थानात मागास जातींना 50 टक्के राखीव जागांची घोषणा शाहू महाराजांनी केली व त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.
◆ शाहू महाराजांनी क्षात्रजगद्गुरू पीठाची निर्मिती केली, हे खालीलपैकी कोणाला आवडले नाही ?
अ】 भास्करराव जाधव
ब】 मुकुंदराव पाटील
क】 प्रबोधनकार ठाकरे
ड】 महर्षी वि रा शिंदे
फक्त ब क
फक्त अ क ड
फक्त ड
वरील सर्व √
◆ खालीलपैकी कोणत्या वर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थान पुरता सहकार कायदा पास केला ?
इ.स. 1915
इ.स. 1912 √
इ.स. 1913
इ.स. 1911
◆ खालीलपैकी बरोबर विधान/ने ओळखा
अ】 इ.स 1925 मध्ये दिनकरराव जवळकर यांनी देशाचे दुष्मन पुस्तक लिहिले.
ब】 जवळकर यांनी सुरू केलेले कैवारी वृत्तपत्र 1930 मध्ये बंद पडले
फक्त अ बरोबर
अ व ब बरोबर √
अ व ब चूक
फक्त ब बरोबर
स्पष्टीकरण
देशाचे दुष्मन हा ग्रंथ दिनकरराव जवळकर यांनी 1925 साली लिहिला. या पुस्तकाला प्रबोधनकार ठाकरे यांनी मशीन गनी ग्रंथ म्हटले.
1928 च्या प्रारंभी ब्राम्हणेतर पक्षाची बाजू मांडण्यासाठी जवळकर यांनी कैवारी वृत्तपत्र सुरू केले.अंतर्गत मतभेद व भांडवलशाहीच्या विळख्यात अडकून 1930 मध्ये ते बंद पडले
◆ तेज' साप्ताहिक विषयी सत्य विधान/ने ओळखा
अ】 तेज दिनकरराव जवळकर यांनी सुरू केले.
ब】 तेज हे मुंबई येथे सुरु करण्यात आले होते.
क】 तेज साप्ताहिक हे 1929 मध्ये सुरू झाले.
ब व क बरोबर
अ व ब बरोबर √
अ व क बरोबर
अ ब क बरोबर
स्पष्टीकरण
तेज हे 9 मे 1931 ला मुंबई येथे सुरू झालेले मराठी भाषेतील
साप्ताहिक होते. दिनकरराव जवळकरांनी सुरू केलेल्या ब्राम्हणेतर वृत्तपत्रांपैकी एक होते. कैवारी बंद पडल्यानंतर जवळकरांनी कोणत्याही सल्लागार मंडळाचा हस्तक्षेप न ठेवता हे साप्ताहिक सुरू केले.
◆ सार्वजनिक सभा' या नावाने त्रैमासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते ?
गोपाळ कृष्ण गोखले
न्या.महादेव गोविंद रानडे√
सार्वजनिक काका
गोपाळ गणेश आगरकर
◆ स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली.
1935
1943
1938√
1940
स्पष्टीकरण
हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली
◆ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म 1903 मध्ये झाला असून त्यांचे मूळ नाव खालीलपैकी काय होते.
विष्णू प्रियमनी सोलगिकर
विद्यानंद विश्वासराव अंकिते
व्यंकटेश भवानराव खेडगीकर √
भागवत नारायण उकलीकर
स्पष्टीकरण
स्वामी रामानंद तीर्थ / व्यंकटेश भगवानराव खेडगीकर 【3 ऑक्टोबर 1903 ते 22 जानेवारी 1972】 एक संन्यासी तसेच
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे चळवळकर्ते होते.त्यांचा_जन्म विजापूर जिल्ह्यात सिंदगी
या ठिकाणी झाला.
◆ उस्ताद लहुजी बुवा साळवे यांचे जन्मठिकाण आणि वर्ष याबाबत योग्य पर्याय ओळखा :
पुरंदर - 1794 √
जेजुरी - 1810
शिरूर - 1815
केंदूर - 1817
स्पष्टीकरण
लहुजी राघोजी साळवे 【14 नोव्हेंबर 1794 - 17 फेब्रुवारी 1881】 हे भारतीय क्रांतिकारक होते. काहीवेळा त्यांचा उल्लेख लहुजी वस्ताद नावाने देखील केला जातो. लहुजींचा जन्म पुरंदर या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायणपूर
गावच्या मांगवाड्यात झाला
◆ खालीलपैकी कोणाचा शारदा सदन 'च्या सल्लागार मंडळात समावेश होता ?
अ】 न्या. काशीनाथ त्र्यंबक तेलंग
ब】 डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर
क】 गोपाळ कृष्ण गोखले
ड】 न्या.महादेव गोविंद रानडे
अ , ब , क
ब , क , ड
अ , क , ड
अ , ब , ड √
स्पष्टीकरण
रमाबाईंनी रमाबाई असोसिएशच्या अनुमतीनं जे सल्लागार मंडळ बनवलं होतं, त्यात रा. ब. कृष्णाजी लक्ष्मण नूलकर, न्या. महादेव गोविंद रानडे, सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, न्या. काशीनाथ त्र्यंबक तेलंग अशी बडी मंडळी होती. या सल्लागार मंडळीशी रमाबाईंचे मतभेद होण्याचं एक कारण असं की, रमाबाई बालविधवांना सुखात ठेवण्याची खटपट करीत, पण सल्लागार मंडळाला ते आवडत नसे.
◆ हाय कास्ट हिंदू वुमन' ग्रंथाबाबत सत्य विधान/ने ओळखा
अ】 हा ग्रंथ पंडिता रमाबाई यांनी लिहिला आहे.
ब】 त्यांनी हा ग्रंथ अमेरिकेत असताना लिहिला.
फक्त अ सत्य
फक्त ब सत्य
अ व ब असत्य
अ व ब सत्य √
स्पष्टीकरण
अमेरिकेतील आपल्या वास्तव्यात हिंदू बालविधवांच्या प्रश्नाचा ऊहापोह करणारे द हायकास्ट हिंदू वूमन 【१८८७-८८】 हे इंग्रजी पुस्तक त्यांनी लिहिले.
ऑक्सफर्डमध्ये शिकणारी पहिली भारतीय महिला: 1883 मध्ये, पंडिता रमाबाई युनायटेड किंगडममधील ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेणार्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. तिने सोमरविले कॉलेजमध्ये संस्कृत आणि भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला आणि ती एक अपवादात्मक विद्यार्थिनी होती.
◆ ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेणार्या पहिल्या भारतीय महिला म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो
पंडिता रमाबाई √
आनंदीबाई जोशी
रमाबाई रानडे
लक्ष्मीबाई टिळक
◆ गोपाळ गणेश आगरकर यांची खालीलपैकी कोणत्या वर्षी फर्ग्युसन महाविद्यालयात प्राचार्यपदी निवड झाली.
1895
1892 √
1888
1890
◆ बेहरामजी मलबारी यांच्याविषयीची सत्य व असत्य विधान/ने ओळखा
अ】 बेहरामजी मलबारी डॉ.जॉन विल्सन यांच्या विचाराने प्रभावित होते.
ब】 बेहरामजी मलबारी यांचा जन्म मुंबई येथे झाला.
अ असत्य व ब सत्य
अ , ब दोन्ही सत्य
अ , ब दोन्ही असत्य
अ सत्य व ब असत्य √
स्पष्टीकरण
मिशनरी शाळेत शिकलेल्या बेहरामजींवर डॉ.जॉन विल्सन यांच्या विचारांचा व व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव होता.
बेहरामजी मलबारी यांचा जन्म 18 मे 1853 मध्ये बडोदा येथे झाला
◆ गोपाळ गणेश आगरकर यांच्याविषयी सत्य विधान/ने ओळखा
अ】 आगरकर यांचा जन्म टेंभू या ठिकाणी झाला.
ब】 टेंभू हे सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात आहे.
फक्त ब सत्य
फक्त अ सत्य
अ,ब दोन्ही सत्य √
अ,ब दोन्ही असत्य
◆ गांधी आणि आयर्विन यांच्यामधील कराराची खालीलपैकी अचूक तारीख ओळखा
【गांधी आर्यविन करार】
16 फेब्रुवारी 1931
11 जानेवारी 1931
09 डिसेंबर 1931
05 मार्च 1931 √
स्पष्टीकरण
गांधी व आयर्विन करार हा महात्मा गांधीजी आणि भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यांत लंडनमधील दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या आधी 05 मार्च 1931 रोजी झालेला एक राजकीय करार होता
छत्रपती शाहू महाराजांनी गुळाची बाजारपेठ 【शाहूपुरी】 खालीलपैकी कोणत्या वर्षी वसवली.
इ.स. 1899
इ.स. 1901
इ.स. 1895 √
इ.स. 1897
स्पष्टीकरण
कोल्हापूर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या गुळाला कोल्हापुरी गूळ म्हणून ओळख मिळावी यासाठी शाहू महाराजांनी शाहूपुरी व्यापार पेठ 1895 मध्ये वसवली होती.
◆ 1907 मध्ये मद्रास प्रांताला भेट देऊन लोकांना बंगाल फाळणी विरोधात स्वदेशी व बहिष्काराचे आवाहन कोणी केले.
लोकमान्य टिळक
गोपाळ कृष्ण गोखले
बिपीनचंद्र पाल √
अरविंद घोष
◆ सत्य विधान /ने ओळखा
अ】 बंगालच्या अन्याय फाळणीची घोषणा 19 जुलै 1905 रोजी करण्यात आली.
ब】 भारतातील पहिला सहकारी पतपेढी कायदा 1904 साली संमत झाला.
अ सत्य , ब असत्य
अ असत्य , ब सत्य
अ , ब दोन्ही सत्य √
अ , ब दोन्ही असत्य
स्पष्टीकरण
लॉर्ड कर्झनने हिंदू-मुस्लिम जनतेमध्ये फुट पाडण्याच्या हेतूने 19 जुलै 1905 रोजी बंगालच्या फाळणीची घोषणा केली
सर एडवर्ड लॉ समिती शिफारशी नुसार सहकारी पतसंस्थाचा
कायदा 1904 हा सहकारी संस्थासाठी पहिला कायदा भारत सरकारने संमत केला.
◆ खालील घटना कोणत्या व्हाइसरॉयच्या काळात काळात घडल्या आहेत ?
अ】 उत्तर ब्रम्हदेश भारतात विलीन करण्यात आला.
ब】 पंजाब कुळ - कायदा संमत करण्यात आला.
लॉर्ड लिटन
लॉर्ड रिपन
लॉर्ड डफरीन √
लॉर्ड मेयो
स्पष्टीकरण
पंजाब कुळ कायदा : 1887
लॉर्ड डफरिन कार्यकाळ : 1884 ते 1888
◆ भारताची पहिली जनगणना कोणाच्या काळात झाली ज्यांना भारतीय आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे ही म्हणतात.
लॉर्ड एल्गिन पहिला
लॉर्ड लिटन
लॉर्ड मेयो √
लॉर्ड रिपन
स्पष्टीकरण
लॉर्ड मेयो 【कार्यकाळ 1869-72】
भारताची पहिली जनगणना सन 1872 मध्ये करण्यात आली
लॉर्ड मेयोने भारतीय जनतेविषयी सुधारणावादी दृष्टीकोण स्विकारून अनेक महत्वपूर्ण सुधारणा केल्या. भारतीय आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हणतात.
◆ सत्य विधान /ने ओळखा (गोपाळ गणेश आगरकर)
(अ) 1877 साली उंब्रजच्या अंबुताई फडके यांच्याशी विवाह झाला.
(ब) जिवंतपणी त्यांची प्रेतयात्रा काढण्यात आली होती.
1) अ व ब √
2) फक्त ब
3) फक्त अ
4) कोणतेही नाही
◆ महर्षी कर्वे यांच्या बाबत असत्य
विधान/ने ओळखा: (अ) त्यांचे आत्मवृत्त इ.स. 1920 साली प्रकाशित झाले.
(ब) त्यांना बनारस विद्यापीठाने डी लिट पदवी दिली.
1) अ व ब
2) फक्त अ √
3) फक्त ब
4) कोणतेही नाही
◆ बेथ्यून कॉलेज बाबत खालीलपैकी सत्य विधान / ने ओळखा
(अ) लॉर्ड हेस्टिंग ने सुरू केले.
(ब) मुंबई येथे सुरू झाले.
(क) या कॉलेजमध्ये फक्त मुलींना शिक्षण दिले जात असे.
1) ब फक्त
2) अ ब फक्त
3) फक्त क √
4) अ ब क
◆ एल्फिन्स्टनचा शिक्षणविषयक दृष्टीकोन अभ्यासा
(अ) धर्म आणि शिक्षण याची फारकत नसली पाहिजे असा विचार होता.
(ब) प्रथम वरच्या वर्गातील लोकांना शिक्षण द्यावे, असा सुरुवातीस विचार होता.
1) फक्त अ बरोबर
2) अ ब चूक
3) फक्त ब बरोबर √
4) अ ब बरोबर
◆ मनुस्मृती दहनाचा ठराव 25 सप्टेंबर 1927 मध्ये महाड परिषदेत कोणी मांडला ?
1) डॉ बाबासाहेब आंबेडकर
2) ज्ञानदेव घोलप
3) बापूसाहेब सहस्त्रबुद्धे√
4) यांपैकी नाही





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!